अनाथ झालेल्या बछड्यांचा युद्धपातळीवर शोध सुरू

मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018 (12:14 IST)
अवनी (टी-१) वाघिणीला बंदुकीच्या गोळ्यांनी ठार मारल्यानंतर अनाथ झालेल्या तिच्या ११ महिन्यांच्या दोन बछड्यांना जेरबंद करण्यासाठी वनविभागाने सात पथके निर्माण केली आहेत. युद्धस्तरावर या बछड्यांचा शोध घेतला जात आहे. रविवारी गस्तीवर असलेल्या एका पथकाला वरूड डॅमजवळ दोन बछडे आढळून आले. परंतु दाट झुडूपात लपून असलेले हे बछडे लगेच दुसरीकडे निघून गेले. नंतर ते न दिसल्याने पथकाला माघारी परतावे लागले. सोमवारी दिवसभरातदेखील त्यांचा ठावठिकाणी मिळाला नाही.
 
गेल्या चार-पाच दिवसांपासून हे दोन्हीही बछडे उपाशी असल्याची शक्यता आहे. आणखी दोन-चार दिवसांत त्यांना काही खायला मिळाले नाही, तर भुकेपोटी त्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती