आमचा पक्ष फुटला की नाही, हे काँग्रेस ठरवू शकत नाही : संजय राऊत

शुक्रवार, 29 डिसेंबर 2023 (08:59 IST)
शिवसेना पक्ष फुटला असल्यामुळे त्यांना तेवढ्या जागा देता येणार नाहीत, असे काँग्रेसने म्हटले होते. त्यावर संजय राऊत म्हणाले, “आमचा पक्ष फुटला की नाही, हे काँग्रेस ठरवू शकत नाही. आमदार आणि खासदार निघून जातात. पण मतदार हा आमच्या बरोबर आहे.”
 
आमचा पक्ष फुटला की नाही, हे काँग्रेस ठरवू शकत नाही. आमदार आणि खासदार निघून जातात. पण मतदार हा आमच्या बरोबरच आहे. शिवसेनेने याआधी 23 जागा लढवलेल्या आहेत. त्यापैकी १८ खासदार निवडून आले होते. त्या २३ जागांवर शिवसेना लढणार आहेच, ही आमची भूमिका आहे. जिंकलेल्या जागांवर नंतर चर्चा करू, पण काँग्रेसकडे एकतरी जिंकलेली जागा आहे का? काँग्रेसला शून्यातून सुरुवात करायची आहे. तरीही आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करायला तयार आहोत”, अशा शब्दात सध्या काँग्रेसकडे एकही खासदार नसल्याबाबतचा टोला संजय राऊत यांनी लगावला.
 
संजय राऊत पुढे म्हणाले, आम्ही 23 जागा लढणार आहोत, हे अत्यंत काळजीपूर्वक आणि आत्मविश्वासाने सांगत आहोत. महाराष्ट्रातील काही नेते टिप्पणी करत असतील तर त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. शेवटी काँग्रेसचे दिल्लीतील नेते याबाबत निर्णय घेतील. तसेच वंचित बहुजन आघाडीबाबत जशी शरद पवार यांनी चर्चा केली, तशी उद्धव ठाकरे यांनीही चर्चा केली. शिवसेना आणि वंचित यांच्या आघाडीचा निर्णय आधीच झालेला आहे. पण त्यांनी महाविकास आघाडी आणि इडिया आघाडीत असावे, अशी आमची भूमिका आहे.

Edited by -Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती