जरांगेंच्या वक्तव्यावर विधानसभेत गोंधळ!

मंगळवार, 27 फेब्रुवारी 2024 (17:57 IST)
सोमवार पासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले आहे. तसेच  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून या अधिवेशनात आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगेंवरून वातावरण तापलं. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत बोलताना विरोधकांवर हल्लाबोल करत जरांगेंच्या वक्तव्यांचा समाचार घेतला. मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र बेचिराख असा उल्लेख केला. जर असं वक्तव्य मनोज जरांगे करत असतील तर काही तर कट रचला जात होता का? असा प्रश्न  त्यंनी विचारला. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनीही केली हे गंभीर आहे? जर महाराष्ट्र बेचिराख करण्याची कोणी भाषा करत असेल. मुंबई उच्च न्यायालय देखील बोलत आहे राज्य सरकारने गांभीर्याने घ्या. कटकारस्थान आणि महाराष्ट्र बेचिराख करण्याच्या भूमिकेबद्दल ज्या पद्धतीचे  सदनात बोलणार नाही तर कुठे बोलणार? ही धमकी आहे का? तसेच काही कटकारस्थान केलंय का? असं न्यायालयानेही म्हटल्याचं शेलार म्हणाले.
 
मराठा समाजाचे आम्ही मोर्चे काढले. तसेच इतर कुठल्याही समाजाला नख न लावता मराठा समाजाला आरक्षण आणि हित जपावं अशी मागणी होती. आरक्षण मिळालंच पाहिजे जे कायद्यात टिकेल. जरांगेंचा आदर करू पण ज्या पद्धतीची भाषा मुख्यमंत्र्यांबद्दल वापरली, तसेच एकेरी उल्लेख केला. भारतीय संविधान आणि कायदा सुव्यवस्था पलीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्यात कधीच नसते. पण तुम्हाला निपटून टाकू असे वक्तव्य मनोज जरांगेंनी केले असे सभागृहात आशिष शेलार म्हणाले.  
 
तसेच पंतप्रधानांना येऊ देणार नाही अशी भाषा उच्चारली. शेलारांनी प्रश्न केला की पंतप्रधानांना अडवणारे हे कोण? आमच्या भूमिकेत आमच्यासोबत विरोधी पक्षनेतेही राहतील असा विश्वास आहे.चौकशी करायला हवी?  कट रचला जातोय याची व महाराष्ट्र बेचिराख करण्याची योजना कुणी केली? असे प्रश्न शेलारांनी विचारले? 
 
तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आदल्या दिवशी बोलतांना राऊत म्हणाले की, एका दिवसात भाजपला संपवेन. तसेच जरांगे पाटील म्हणतात दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्र्यांना निपटून टाकेन. हे सहज आहे का? म्हणून याच्यामागे कटकारस्थान असल्याचा आरोप आशिष शेलारांनी केला आहे. देवेंद्रजींबद्द्ल जरांगेंनी जी भाषा वापरली त्याकडे एकवेळ दुर्लक्ष करू. देवेंद्रजी कधी बोलणार नाहीत. पण महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींची सभा उधळून टाकू म्हणतात.  संदेश सदनातून आज जायला हवा. महत्व ह्या व्यक्तीला द्यायचं नाही. तसेच समाजाची मक्तेदारी एका व्यक्तीला दिली नाहीये. यावेळी सदनात विरोधी पक्षाच्या आमदारांनी गोंधळ केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधकांवर करण्यात आलेल्या आरोपांनंतर विरोधकांनी विरोध केला.
 
काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात हे आशिष शेलारांच्या भाषणानंतर म्हणाले की, महत्त्वाचा मुद्दा शेलारांनी उपस्थित केला, याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात आहे. या आधीही  मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मोर्चे झाले. व शांततेने चाललेल्या आंदोलनात लाठीचार्ज झाला. तसेच चुकीचे बोलल्या बद्द्ल त्याच समर्थन करणार नाही व त्यामागील भावना ओळखयला हवी तसेच हे का घडले हे पहायला हवे तसेच जर चुकीचे बोलले गेले तर त्याचे समर्थन करणार नाही

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती