दुकान बंद करत प्रेयसीचा गळा चिरला, स्वतःही मरण्याचा प्रयत्न

बुधवार, 23 ऑक्टोबर 2019 (15:35 IST)
मीरा भाईंदर येथे धक्का दायक प्रकार घडला आहे. प्रेम प्रकरणातून प्रेयसीची हत्या प्रियकराने केल्यानंतर त्याने स्वतः देखील आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. घटना मुंबई येथे घडली आहे. या प्रकरणात 28 वर्षीय आरोपीने 22 वर्षीय तरुणीची दुकानात गळा चिरुन हत्या केली आहे. 
 
भाईंदर पूर्व येथील तलाव रोड परिसरात बाळकृष्ण लीला बिल्डिंगमधील दुकानात हा सर्व थरार घडला आहे. महालक्ष्मी डेअरी या आपल्या भावाच्या दुकानावर आरोपी कुंदन आचार्य दुपारच्या वेळी बसला होता. त्यावेळी त्याची प्रेयसी अंकिता रावल भाजी खरेदी करण्यासाठी तेथे आली होती. यावेळी नेहमी प्रमाणे कुंदनने तिला दुकानात बोलावलं सोबतच अनपेक्षित दुकानाचे शटर बंद केले. त्दोयावेळी या दोघांमध्ये जोरदार कारणावरुन बाचाबाची झाली. 
 
त्यानंतर कुंदनने चाकू काढून अंकिताच्या गळ्यावर सपासप वार केले. यामध्ये अंकिताचा जागीच मृत्यू झाला. अंकिताच्या हत्येनंतर त्याने स्वतःचा गळा आणि मानेवर वार केले, मात्र त्याला वेदना असह्य झाल्यामुळे तो दुकानाचं शटर उघडून बाहेर पडला, तेव्हा तो रक्ताच्या थारोळ्यात पडला, आजूबाजूच्या लोकांनी त्याला रुग्णवाहिकेने मीरारोडमधील लाईफ लाईन रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं. कुंदनवर उपचार सुरु असून त्याची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी घटनेची नोंद केली असून, पुढील तपास करत आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती