बाबा आमटे यांची नात आणि डॉ. विकास आमटे यांची कन्या डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या

सोमवार, 30 नोव्हेंबर 2020 (15:47 IST)
आनंदवन येथील महारोगी सेवा समिती सीईओ डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केली आहे. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात डॉ. शीतल आमटे यांना उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले आहे. डॉ. शीतल आमटे यांनी स्वतःला विषारी इंजेक्शन टोचून घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र अद्याप मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. 
 
डॉ. शीतल आमटे सध्या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करती होत्या. मागील काही महिन्यांपासून आमटे कुटुंबात अंतर्गत संघर्ष पेटला होता. हा वाद अनेकदा समोर आला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती