आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी आंदोलन मागे घ्यावे, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

शनिवार, 26 सप्टेंबर 2020 (08:54 IST)
महाराष्ट्रातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांनी आपलं प्रस्तावित आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. आशा स्वयंसेविका या आरोग्य विभागाचा कणा आहेत. त्यांच्यामुळे कोविड १९ सारख्या गंभीर आजारावर नियंत्रण मिळवण्यास मोलाचे सहकार्य मिळते आहे. आशा स्वयंसेविका या घरोघरी जाऊन त्या कुटुंबांतील सदस्यांची आरोग्य तपासणी करत आहेत. तसंच घरोघरी जाऊन त्या त्या कुटुंबांना कोविड १९ ची माहिती देत आहेत. करोनाशी लढा देण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे त्यामुळे आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी आपले प्रस्तावित आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. 
 
प्रस्तावित संप मागे घेण्याबाबत जे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे त्यासंदर्भात एक पत्रक काढण्यात आलं आहे. आशा स्वयंसेविकांना अमलबजावणी आराखड्यातील मंजुरीनुसार सेवांवर आधारित मोबदला मिळतो आहे. सोबतच स्वयंसेविकांच्या कामाची दखल घेऊन राज्य शासनाने आशा स्वयंसेविकांना दरमहा २ हजार रुपये आणि गटप्रवर्तकांना ३ हजार रुपये मोबदला राज्य शासनाच्या निधीतून देण्याचाही निर्णय घेतला आहे. यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद पुरवणी मागण्यांमध्ये करण्यात आली आहे. लवकरात लवकर हा मोबदला आपणला मिळणार आहे. अमलबजावणी आराखड्यात गटप्रवर्तकांचा जो मोबदला कमी करण्यात आला आहे त्या मोबदल्याची मागणी नव्याने केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे असंही या पत्रात म्हटलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती