नाईट लाईफ: आपण पुणेकर आहोत, पुणेकरांना मान्य होईल असा निर्णय घेणार

सोमवार, 20 जानेवारी 2020 (10:35 IST)
मुंबईतील काही ठिकाणी २६ जानेवारीपासून नाईट लाईफ सुरू करणार असल्याची घोषणा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली असून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधून प्रस्ताव आला, त्यावर विचार करू, असं देखील ते म्हणाले. पण जेव्हा पुण्यात नाईट लाईफ सुरू करण्याच्या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना मत मांडायला सांगितले तर त्यांनी पुणेरी शैलीत उत्तर दिलं. “आपण पुणेकर आहोत. पुणेकरांना मान्य होईल, असा निर्णय घेण्याचा विचार करू.”
 
अजित पवार म्हणाले मुंबईचं लाईफ वेगळं आहे. मुंबई कधी झोपत नाही, ती २४ तास जागी असते. त्यामुळे मुंबईबद्दल तसा निर्णय घेतला आहे. त्याबद्दलचा अनुभव काय येतो, हे पाहून  पुढचा विचार करू. मुंबईत सुरू झालं म्हणून लगेच पुण्यात सुरु करा, असं नसतं. आपण पुणेकर आहोत, पुणेकरांचे वेगळं मत असू शकतं. त्यामुळे पुणेकरांना मान्य होईल, तसेच मुंबई येथील अनुभव घेतल्यानंतर या गोष्टीचा विचार करू. या वेळी अजित पवारांनी संतुलित भूमिका घेत म्हटले की सुरू करणार किंवा नाही करणार असं कुठलंही स्पष्ट मत मांडलं नाही. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती