राज्यात आणखी ८ स्पेशल ट्रेन धावणार

शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020 (08:23 IST)
मध्य रेल्वे आणखी ८ स्पेशल ट्रेन राज्यात सुरु करणार आहे. ११ ऑक्टोबरपासून या ट्रेन धावणार आहेत. मुंबई-कोल्हापूर, मुंबई-लातूर, पुणे-नागपूर, पुणे-अमरावती, मुंबई-नांदेड या रेल्वे धावणार आहेत. याआधी मुंबईहून पुणे, नागपूर, सोलापूर, कोल्हापूरसाठी काही गाड्या  सुरु होत आहेत. 
 
मुंबई-कोल्हापूर ही विशेष गाडी दररोज धावणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कोल्हापूरसाठी रवाना होईल. ही गाडी परतीसाठी सुरु राहणार आहे. मुंबई-लातूर सुपरफास्ट विशेष आठवड्यात चार दिवस धावणार आहे. ही सुपरफास्ट विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दर सोमवारी, मंगळवार, गुरुवार आणि रविवारी  लातूरसाठी रवाना होईल. तसेच ही गाडी परतीसाठी सुरु राहणार आहे.
 
पुणे-नागपूर एसी स्पेशल साप्ताहिक गाडी सोडण्यात येणार आहे. तसेच पुण्यातून पुणे-अजनी एसी स्पेशल साप्ताहिक आणि पुणे-अमरावती एसी स्पेशल साप्ताहिक गाडी सुरु करण्यात येणार आहे. तर अजनी-पुणे एसी स्पेशल साप्ताहिक सोडण्यात येणार आहे. तसेच कोल्हापूरमधून गोंदियासाठी गाडी सोडण्यात येणार आहे. श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर-गोंदिया विशेष दररोज गाडी धावेल. 
 
तसेच  मुंबई- हजूर साहिब नांदेड विशेष दररोज गाडी धावणार आहे. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, लासलगाव, मनमाड, नगरसोल, रोटेगाव, लातूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, परभणी आणि पूर्णा असे थांबे असतील.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती