फुग्याने घेतला साडेचार वर्षाच्या मुलाचा बळी

गुरूवार, 3 डिसेंबर 2020 (11:03 IST)
मुंबईतल्या अंधेरी भागात फुग्याचा तुकडा घशात अडकल्याने सा़डेचार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. देवराज सुरज नाग असे त्या मुलाचे नाव आहे.
 
देवराज  त्याच्या बहिणीसोबत खेळत होता. यावेळी फुगा फुगवत असतानाच अचानक फुग्याचा तुकडा त्याच्या घशात अडकला. पालकांनी त्याला तातडीने अंधेरीतील क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल केले, त्याची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्याला नानावटी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. फुग्याचा तुकडा घशात अडकल्यानेच देवराजचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनात स्पष्ट झाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती