ठाण्यात सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या टाकीत गुदमरुन तीन कामगारांचा मृत्यू

शुक्रवार, 10 मे 2019 (11:45 IST)
ठाण्यातील ढोकाळी नाका येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील टाकीत गुदमरुन तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी रात्री टाकीत आठ कामगार अडकल्याची घटना घडली. या घटनेत तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू झाला असून पाच कामगारांना बाहेर काढण्यात यश आले आहे.
 
मृतकांची नावे अमित पुहाल (वय २०), अमन बादल (वय २१), अजय बुंबक (वय २४) असे आहेत.
 
ढोकाळी नाका येथील प्राइड प्रेसिडन्सी लक्झेरिया येथील टाकीच्या साफसफाईसाठी आठ कामगार आत उतरले होते. मात्र, सर्व त्यात अडकले असे कळल्यावर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन तासांच्या मोहीमेनंतर सर्वांना बाहेर काढण्यात आले. आठ कामगारांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यातून तीन कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जखमी 5 कामगारांवर उपचार सुरु आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती