महाराष्ट्राच्या या भागांत 3 दिवस पाऊस

रविवार, 25 फेब्रुवारी 2024 (13:25 IST)
राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट मुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.या मुळे शेतकरी चिंतेत आहे.आता पुन्हा विदर्भात पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. येत्या 3 दिवसांत 25 ते 27 फेब्रुवारी कालावधीत मध्य भारताच्या काही भागात तसेच विदर्भात आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पावसासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

भंडारा, नागपूर, गडचिरोली, गोंदिया, आणि अमरावती या जिल्ह्यात पावसाची तीव्रता अधिक राहण्याचा अंदाज आहे. सध्या पहाटे गारवा नंतर दुपारी उकाडा आणि संध्याकाळी गारवा अशी स्थिती बनत आहे. हा सम्पूर्ण आठवडा वातावरण ढगाळ आणि पावसाचं असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
 
विदर्भातील अनेक जिल्हे आणि नागपूरच्या भागात विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मुंबई, पुण्यात व इतर भागात हवामान कोरड राहण्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे.  

Edited By- Priya Dixit  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती