मुंबईत समोसा पार्टी करणे पडले महागात, गुन्हा दाखल

बुधवार, 20 मे 2020 (10:34 IST)
लॉकडाऊनच्या या काळत मुंबईच्या घाटकोपर येथील एका हाउसिंग सोसायटीमध्ये समोसा पार्टीचं आयोजन करण्यात आलं. याप्रकरणी नियमांचे उल्लंघन करुन पार्टीचं आयोजन केल्यामुळे पोलिसांनी गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांवर कारवाई केली आहे.
 
लॉकडाउनच्या काळात समोस पार्टीचं आयोजन करून नियमाचं उल्लंघन केलं गेलं म्हणून घाटकोपरच्या पंतनगर पोलिसांनी हाउसिंग सोसायटीच्या सदस्यांविरोधात गुन्हा दाखल केला. 
 
मीडिया सूत्रांप्रमाणे घाटकोपरच्या कुकरेजा पॅलेस या सोसायटीमध्ये समोसा पार्टी आयोजित करण्यात आली होती. यासह म्यूझिक आणि डांस देखील आयोजित करण्यात आले होते. याच इमारतीत भाजपाचे आमदार प्रकाश मेहताही राहतात, असे सांगितले जात आहे. याप्रकरणी गृहनिर्माण संस्थेचा अध्यक्ष आणि समोसा पार्टीच्या आयोजकाला अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाल्याची माहिती दिली जात आहे.
 
सोशल मीडियावरही या समोसा पार्टीचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. या परिसरात सोसायटीचे सुमारे 30 लोक एकत्र जमून समोसा पार्टी करत असल्याचे दिसत आहेत. म्यूझिकल कॉन्सर्ट देखील ठेवण्यात आले होते. या दरम्यान कोणीही मास्क लावलेला दिसत नाहीये तसेच सोशल डिस्टेंसिंग ऐशीतैशी झाली असल्याचे चित्र दिसत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती