सांगलीत बोट उलटून 16 ठार

अतिवृष्टीमुळे पुराच्या वेढ्यात अडकलेल्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याची स्थिती अजूनही बिकट आहे. हवामान खात्याने आज आणि उद्या अतिवृष्टी चा इशारा दिला आहे. त्यामुळे धरणातील साठा वाढल्याने नद्यांची पाणी पातळी वाढणार आहे.
 
सांगली जिल्ह्यात मोठया प्रमाणात बचावकार्य सुरू आहे. लोकांची बाहेर येण्यासाठी धडपड सुरू आहे. अशातच एक बोट उलटून 16 ठार झाले आहेत. त्यात तीन मुलं, पाच महिला आणि आठ पुरूषांचा समावेश आहे. सांगलीतल्या पलूस तालुक्यातल्या ब्रम्हनाळमध्ये ही घटना घडली आहे. या बोटीत 30 लोक होते, अशी माहिती मिळत आहे.
 
कोल्हापूर आणि परिसरात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.
 
कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील अनेक मार्ग आजही बंद आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील 112 बंधारे पाण्याखाली गेले असून पंचगंगा नदीची पाणी पातळी 55 फुटांच्यावर गेलीय. कोल्हापूर शहरातील व्हीनस कॉर्नर परिसर बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आला आहे.
 
सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि कोयना नद्यांच्या पाणी पातळीत दर तासाला वाढ होतेय.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती