मालेगावमध्ये 12 वर्षाच्या मुलाने बिबट्याला ऑफिसच्या केबिनमध्ये बंद केले

बुधवार, 6 मार्च 2024 (17:40 IST)
मालेगाव- मालेगाव येथून एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून ते धक्कादायक आहे. वास्तविक हा व्हिडिओ एका लहान मुलाचा आणि बिबट्याचा आहे. मालेगावच्या नामपूर रोडवरील पार्टी लॉनमधील ऑफिस रूममध्ये 12 वर्षांचा मुलगा मोबाईलवर गेम खेळत बसला होता. तेवढ्यात अचानक एक बिबट्या आत शिरला. त्यावेळी मुलाने वेळ वाया न घालवता निर्णय घेतला आणि बुद्धी आणि हिंमत दाखवत बिबट्या पुढे जाताच दार बंद करून बाहेर पडला.
 
मोहित विजय अहिरे असे मुलाचे नाव आहे. हा मुलगा वेडिंग हॉलच्या बुकिंग ऑफिसच्या प्रवेशद्वाराजवळचा बेंचवर बसून मोबाईलवर गेम खेळण्यात मग्न असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. त्याच क्षणी बिबट्या आत शिरला. नशीबाची गोष्ट म्हणजे बिबट्याचे लक्ष मोहितकडे नव्हते आणि तो पुढे सरकतो. त्याच वेळी, मुलगा बिबट्याला पाहून मुळीच आरडा-ओरडा न करता धैर्य आणि शहाणपण दाखवत खोलीतून बाहेर पडतो आणि दार लोटून घेतो.
 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by webdunia.marathi (@webdunia.marathi)

बालक मोहित विजय अहिरे याने सांगितले की, मी ऑफिसमध्ये बसलो होतो. दरवाजा उघडा होता. तेवढ्यात बिबट्या आला आणि सरळ पुढे गेला. त्याचा आवाज जोरात येत होता. मी त्याला पाहिले, माझा फोन घेतला आणि दरवाजा बंद केला आणि पळून गेलो. घरी आल्यावर मी माझ्या वडिलांना सांगितले, नंतर त्यांनी मालकाला फोन केला आणि येथे येऊन शटर बंद केले. बिबट्याला पाहून मला थोडी भीती वाटली. मालेगाव शहरातील जाजुवाडी परिसरातील साई सेलिब्रेशन लॉनमध्ये ही घटना घडली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती