रक्षाबंधन 2020 भावाच्या कपाळी टिळा लावण्याचे 12 चमत्कारी फायदे जाणून घेऊ या..

बुधवार, 29 जुलै 2020 (18:07 IST)
रक्षाबंधनाचा सण असो किंवा इतर कुठल्याही प्रसंग असो  आपल्या कपाळाला टिळा लावण्याची परंपरा वर्षानुवर्षे पासूनची आहे. आपण लहानग्यावया पासून आपल्या भावाला राखी बांधण्याच्या पूर्वी टिळा लावतातच पण आपणास हे ठाऊक आहे का की हा टिळा का लावतात. काय आहे याचे शुभ महत्त्व. जाणून घेऊ या...
 
रक्षा बंधन 2020 रोजी आपणास हे जाणून आश्चर्य होणार की वर्षानुवर्षाची ही जुनाट परंपरा आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत-
 
1 साधारणपणे चंदन, कुंकू, माती, हळद, रक्षा या सर्वांचा टिळा लावला जातो. असे म्हणतात की ज्यांना टिळा लावलेले दाखवायचे नसेल तर, ते लोक पाण्याने देखील टिळा लावून आणि त्याचे फायदे मिळवू शकतात.
2 कपाळी टिळा लावण्याने व्यक्तिमत्त्व प्रभावी होते. वास्तविक टिळा लावण्याचा मानसिकदृष्ट्या परिणाम होतो आणि यामुळे व्यक्तीच्या आत्मविश्वासात आणि आत्मबळात वाढ होते.
3 असे मानले जाते की कपाळी नियमाने टिळा लावल्याने मेंदू शांत राहतो आणि आराम मिळतो. तसेच अनेक मानसिक आजार देखील बरे होतात.
4 कपाळी टिळा लावल्याने मेंदूत सेरोटोनिन आणि बीटा एंडोर्फिनचे स्राव संतुलित पद्धतीने होतात, ज्यामुळे उदासीनता दूर होण्यात मदत मिळते. तसेच डोकेदुखीच्या त्रासात कमतरता येते.
5 हळदीचा टिळा लावल्याने त्वचा शुद्ध होते कारण हळदीमध्ये अँटी बेक्टेरियल घटक असतात, जे आजारांपासून मुक्त करण्यात साहाय्य असतात.
6 धार्मिक मान्यतेनुसार चंदनाचा टिळा लावल्याने माणसाच्या सर्व पापांचा नायनाट होतो. लोक अनेक प्रकारांच्या संकटापासून वाचतात आणि ज्योतिषशास्त्रानुसार, टिळा लावल्याने ग्रहांची शांती होते.
7 असे मानले जाते की चंदनाचा टिळा लावणाऱ्याचे घर अन्न-संपत्तीने भरलेले असतं आणि सौभाग्य वाढतं.
8 राखीच्या या शुभ प्रसंगी बहिणी आपल्या भावाच्या कपाळी टिळा लावतात. शास्त्रात पांढरे गंध किंवा चंदन, रक्तचंदन, कुंकू रक्षा इत्यादीने टिळा लावणं शुभ मानले गेले आहेत पण रक्षाबंधनाच्या दिवशी कुंकवाचाच टिळा लावतात. कुंकूच्या तिळासह तांदुळाचा वापर देखील करतात.
9 हा टिळा विजय, पराक्रम, सन्मान, श्रेष्ठत्व आणि वर्चस्वाचे प्रतीक आहेत. टिळा नेहमी कपाळाच्या मध्य भागी लावतात. ही जागा सहाव्या इंद्रियांची असे.
10  याचे वैज्ञानिक कारण असे आहे की जर शुभ भावाने कपाळाच्या या स्थानी तिळाच्या माध्यमाने दाब दिला तर स्मरण शक्ती, निर्णय घेण्याची क्षमता, बौद्धिकता, तार्किकता, साहस आणि बलवृद्धि होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती