पंजाबी चिकन करी

मंगळवार, 25 जून 2019 (10:03 IST)
साहित्य : 500 ग्रॅम चिकन, 2 लहान वेलची, 1 मोठी वेलची, 2 तुकडे दालचिनी, 1 तेजपान (तमालपत्र), 1/2 चमचा तिखट, 1 लहान चमचा आलं लसूण पेस्ट, 3 मध्यम आकाराच्या  कांद्याची पेस्ट, 2 टोमॅटो प्युरी, चवीनुसार मीठ, साजुक तूप किंवा तेल. 
 
कृती : सर्वप्रथम कढईत तेल गरम करा. चिकनला हलक्याने तळून बाहेर काढा. आधी तेजपान नंतर कांद्याची पेस्ट घालून त्याला सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्या. नंतर त्यात आलं लसुणाची पेस्ट घाला. टोमॅटो प्युरी घाला. त्यात तिखट आणि मीठ घाला. साबूत गरम मसाल्याची पूड करून अर्धी पूड त्यात घाला. चिकन घालून चांगले परतून घ्या. आता थोडे पाणी घालून त्याला शिजू द्या. नंतर त्यात उरलेली मसाल्याची पूड घाला आणि तंदुरी पोळीसोबत गरमा गरम सर्व्ह करा. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती