सीरम इन्स्टिट्युटनं पुणे महापालिकेला लसींचा थेट पुरवठा करणार

बुधवार, 26 मे 2021 (11:18 IST)
कोरोनावरील लसीचे उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्युटनं  पुणे महापालिकेला लसींचा थेट पुरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र त्यासाठी केंद्राच्या परवानगीची आवश्यकता आहे. तसं पत्र सीरमने पुण्याच्या महापौरांना दिलं आहे. दरम्यान पुण्यातील खासगी हॉस्पिटलकडून सुरू असलेल्या लसीकरनाचे दर शासनाने निश्चित करून द्यावेत अशी विनंती महपौरांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. राज्यात यापुढील काळात कोरोना रुग्णांना गृह विलगीकरणात राहता येणार नाही असा निर्णय आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केला आहे. मात्र पुण्याच्या बाबतीत हा निर्णय अव्यवहार्य असेल असं मत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केलं आहे.
 
कोरोनाचा लस घेतलेल्या रुग्णांमध्ये कमी प्रमाणात संसर्ग झाल्याचं समोर आल्यानंतर लस घेण्यासाठी आता लोकं गर्दी करत आहेत. पण मोठ्या प्रमाणात लसींचा साठा नसल्याने लसीकरणाचा वेग कमी आहे. मागणी प्रमाणे उत्पादन होत नसल्याने आणखी काही वेळ वाट पाहावी लागणार आहे. महापालिका आता स्वतः लसींसाठी वॅक्सीन बनवणाऱ्या कंपन्यांकडे थेट पुरवठ्यासाठी मागणी करत आहेत.  पुणे महापालिकेचा देखील सीरम इन्स्टिट्यूटकडे लसींसाठी पाठपुरावा सुरु आहे. करत आहे. पुणे महापालिकेला आता केंद्र सरकारची परवानगी लागणार आहे. पणे महापालिकेने आता परवानगीसाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना पत्र लिहिले आहे. त्यामुळे पुणेकरांना लवकर लस मिळण्यासाठी केंद्र सरकारच्या परवानगीची वाट पाहावी लागणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती