अखेर पुण्यातल्या जम्बो कोविड केअर सेंटरचं कंत्राट काढून घेतल

गुरूवार, 10 सप्टेंबर 2020 (09:03 IST)
पुण्यातील जम्बो कोविड केअर सेंटरचं उपचारासाठीचं दिलेलं कंत्राट काढून घेण्यात आलं आहे. लाईफ लाईन या एजन्सीला याबाबत कंत्राट देण्यात आलं होतं. अनेक तक्रारी, रुग्णांची होणारी परवड आणि पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूनंतर चौकशी बाबत विचारण्यात आलेला खुलासा, यावरून लाईफ लाईन एजन्सी चांगलीच गोत्यात आली होती. 
 
त्यानंतर एजन्सीच्या १२० डॉक्टर,नर्सिंग स्टाफने दिलेला राजीनामा यावरून लाईफ लाईन या एजन्सीचे काम थांबवण्यात आले. पालिकेककडे यांचं नियंत्रण देण्यात आलं आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिकेसह काही सरकारी स्टाफ नेमण्यात आला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती