कॅन्टोन्मेंटमधील सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाच्या आयसीयूत आग

शनिवार, 5 सप्टेंबर 2020 (15:50 IST)
पुणे शहरातील कॅन्टोन्मेंटमधील सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाच्या आयसीयू प्रभागात आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताचं अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचं काम सुरू आहे.
 
अद्याप आगीचं कारण स्पष्ट झालेलं नाही. सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाच्या आयसीयू प्रभागात आग झागल्याने तेथील रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत.
 
पुणे कॅम्प परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात इलेक्ट्रिकल शॉर्टसर्किटमुळे आग लागली. रुग्णालयाच्या आयसीयू विभागातच आग लागल्याने रुग्णालय व्यवस्थापन यंत्रणेची त्यामुळे चांगलीच पळापळ झाली. या आगीची तात्काळ माहिती अग्निशामक दलाला देण्यात आली. अग्निशामक दलाने दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना व नुकसान टळले. तसेच आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर थोड्याच वेळात रुग्णालयाची सर्व प्रकारची वैद्यकीय सेवा सेवा पूर्ववत सुरु करण्यात आली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती