कात्रज प्राणी संग्रहालयातून पळालेला बिबट्या जेरबंद

बुधवार, 6 मार्च 2024 (09:26 IST)
बिबट्या अखिल प्राणी संग्रहालयामध्ये लावण्यात आलेल्या जाळ्यामध्ये जेरबंद झाला. जवळपास ४० तासानंतर कात्रज प्राणी संग्रहालयातील बिबट्याला जेरबंद करण्यात प्रशासनाला यश आले आहे.
 
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. प्राणी संग्रहालय प्रशासन व इतर विभाग त्याच्यावर नजर ठेऊन होते. प्राणी संग्रहालयामध्ये हालचाली टिपणाऱ्या वेगवेगळ्या कॅमेऱ्यासह ९ पिंजरे लावण्यात आले होते. लावण्यात आलेल्या पिंजऱ्यापैकी एका पिंजऱ्यात अखेर बिबट्या अडकला.मंगळवार रात्री ९ वाजून १५ मिनिटांनी  बिबट्याला जेरबंद करण्यात आले.
 
प्राणी संग्रहालय मध्ये असणाऱ्या सांबर च्या जवळपास ठेवण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या अडकला. यासाठी कालपासून प्रयत्न सुरू होते. बिबट्याला पकडण्यामध्ये आम्हाला यश आले असून ऑपरेशन सक्सेसफुल झाले आहे असे संचालक राजकुमार जाधव यांनी सांगितले.

Edited by -Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती