21 नामांकीत रुग्णालयांकडून कोरोनाबाधित रुग्णांची ‘लुटमार’

गुरूवार, 10 सप्टेंबर 2020 (08:59 IST)
वाढीव बिले आकारून कोरोनाबाधित रुग्णांची लुटमार करणा-या पिंपरी-चिंचवडमधील 21 नामांकीत रुग्णालयांचे पितळ उघडे पडले आहे. लॉकडाऊनच्या काळात आर्थिक परिस्थितीने जर्जर झालेल्या कोरोनाबाधीत निष्पाप लोकांकडून अवास्तव बिले आकारून या रुग्णालय व्यावस्थापनानी राज्य शासनाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. या सर्व रुग्णालयांना पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नोटीस बजावली आहे.
 
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत खासगी रुग्णालयांना कोविड 19 विषाणुग्रस्त रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी देण्यात आली. राज्य शासनाच्या निर्देशानुसार रुग्णांना माफक दरात उपचार देण्याचे आदेशही देण्यात आले होते. त्यासोबतच कोरोनाबाधीत रुग्णांचा दैनंदीन डेटाही कळविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, काही खासगी रुग्णालयांनी याचा गैरफायदा घेऊन कोरोनाबाधीत रुग्णांवर केलेल्या उपचाराचे अवास्तव शूल्क आकारल्याचे उघडकीस आले आहे. त्यामध्ये शहरातील 21 नामांकीत रुग्णालयांचा समावेश आले.
 
अवास्तव बिले अकारणा-या रुग्णालयांची नावे
 
यामध्ये साईनाथ हॉस्पिटल, विवेकानंद हॉस्पिटल, आयुष मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, स्टर्लिंग हॉस्पिटल, लोकमान्य हॉस्पिटल (चिंचवड), ओजस मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, धन्वंतरी हॉस्पिटल (निगडी), आदित्य बिर्ला हॉस्पिटल, डी. वाय. पाटील हॉस्पिटल (नेहरूनगर), जीवनज्योती हॉस्पिटल (काळेवाडी), फिनिक्स हॉस्पिटल (थेरगाव), अंगद मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल (भोसरी), ऑक्सिकेअर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, लाईफपॉईंट हॉस्पिटल (वाकड), अॅकॉर्ड हॉस्पिटल, मेट्रो मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल (रहाटणी), देसाई अॅक्सिडंट अॅण्ड जनरल हॉस्पिटल आदी रुग्णालयांचा सहभाग आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती