सिरमची कोरोना लस अवघ्या २२५ ते २५० रुपयांत मिळणार

शनिवार, 8 ऑगस्ट 2020 (09:27 IST)
पुण्यातली सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने ऑक्सफर्डच्या मदतीने लस आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. ही लस सर्वांना मिळावी यासाठी आता पुण्याच्या सिरम इन्स्टिट्युटने आणखी एक पाऊल उचललं आहे. या लसीची जास्तीत जास्त किंमत ३ यूएस डॉलर्स म्हणजे साधारण २२५ ते २५० रुपयांच्या घरात असेल अशी माहिती सिरम इन्स्टिट्युटने दिली आहे. 
 
सिरम ही संस्था, GAVI ही आंतरराष्ट्रीय लस संस्था आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन एकत्र आले आहेत. बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन करोना लसीसाठी १५० मिलियन डॉलर्सचा निधी दिला जाणार आहे. GAVI मार्फत निधी सिरम इन्स्टिट्युटला करोना लसीच्या उत्पादनसाठी दिला जाईल. सिरम इन्स्टिट्युट २०२१ पर्यंत १०० दशलक्ष डोस पुरवणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती