परीक्षेची तयारी सोपी करण्यासाठी टिप्स

शुक्रवार, 26 मार्च 2021 (18:37 IST)
परीक्षेचे नाव घेतल्यावरच एक धडकी भरते. आता काही दिवसातच परीक्षा सुरु होणार आहे .विद्यार्थ्यांना परीक्षेला घेऊन काळजी असते. बऱ्याच वेळा परीक्षेची चांगली तयारी असून देखील काही विद्र्यार्थीं गोंधळून जातात आणि चुका करतात. या मुळे त्यांना अपेक्षित परिणाम मिळत नाही.विद्यार्थी आपला आत्मविश्वास गमावून बसतात.असं होऊ नये यासाठी काही टिप्स सांगत आहोत.  
 
1 आत्मपरीक्षण करा- आपण दिवसभरात जे देखील वाचता ते एका कॉपी मध्ये लिहून ठेवा. काही प्रश्न पत्र तयार करून त्यांना न बघता लिहण्याचा प्रयत्न करा. त्या प्रश्नांची चाचणी करण्यासाठी आपली शिक्षकांची किंवा मित्रांची मदत घ्या. असं शक्य नसेल तर स्वतःच चाचणी करा. जेणे करून आपण केलेल्या चुका समजतील आणि त्या चुका परत होणार नाही. 
 
2 परीक्षेपूर्वी अभ्यास करण्याची सवय टाळा- काही विद्यार्थ्यांची सवय असते परीक्षेच्या पूर्वी वेळेवर अभ्यास करतात. असं करू नये. वर्षभर केलेला अभ्यासच आपल्याला यश मिळवून देऊ शकतो. या मुळे आपल्याला परीक्षेची भीती वाटणार नाही आणि आपण शांत मनाने पेपर लिहू शकाल. 
 
3 मेंदू शांत ठेवा- संशोधनात आढळून आले आहे की एक शांत मेंदू चौपट
 वेगाने काम करतो. मेंदू शांत असेल तर चुका देखील कमी होतील. आपण आपला पेपर देखील चांगला करू शकाल.  
 
4 परीक्षेच्या काळात रिव्हिजन करा- काही विध्यार्थी परीक्षेचा काळात अभ्यास करतात या मुळे त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होत नाही आणि परीक्षेत काही प्रश्न सुटतात. असा गोंधळ होऊ नये या साठी परीक्षेचा शेवट चा काळ पुनरावृत्तीसाठी द्या. असं केल्याने सर्व विषयांची पुनरावृत्ती किंवा रिव्हिजन चांगल्या प्रकारे होईल आणि मन आणि मेंदू देखील शांत होईल. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती