घरातून नीटच्या परीक्षेची तयारी कशी करावी जाणून घ्या काही टिप्स

गुरूवार, 18 फेब्रुवारी 2021 (20:25 IST)
घरातून नीटची तयारी करण्यासाठी सातत्य असणे महत्त्वाचे आहे आपण कोचिंग क्लासरूमचा भाग होणार नाही म्हणून आपण स्वतःचे वेळापत्रक बनवून घ्या आणि त्यानुसार कार्य करा. दररोज किमान तीन घंटे आपत्कालीन आणि अपरिहार्य परिस्थिती शिवाय वेळा पत्रकांचे पालन करावे.या शिवाय काही टिप्स आहे ज्यांना अवलंबवावे.
घरातून नीट च्या परीक्षेच्या तयारी साठी टिप्स 
 
*नीटच्या परीक्षे संबंधी सर्व महत्त्वाची माहिती शोधा.
*आपली अभ्यास योजना तयार करा.
* नीटचा सर्व अभ्यासक्रम जाणून घ्या.  
* योग्य वेळ सारणी सेट करा.
* एनसीईआरटी पुस्तकांच्या मदतीने नीटच्या परीक्षेची तयारी करा.
* अतिरिक्त सामग्रीसाठी इतर संदर्भ पुस्तकांची मदत घ्या.
* मॉक टेस्ट/ नमुना पेपर्स/मागील वर्षाचे पेपर्स सोडवून बघा.
* स्वतःचे मूल्यांकन करा.
* पुनरावृत्ती करा.
* एकाग्रचित्त राहा.
 
* अभ्यास योजना बनवा आणि त्यानुसार कार्य करा.
 
*अभ्यासक्रमावर लक्ष द्या. जेणे करून हे समजेल की कोणते महत्त्वाचे धडे  आहे आणि त्या साठी कोणत्या पुस्तकांची गरज आहे.एनसीईआरटी च्या पुस्तकाचा चांगल्या प्रकारे अभ्यास करावा.  
 
*अतिरिक्त सामग्री साठी संदर्भ पुस्तकांची मदत घ्या.एनसीईआरटीच्या अशा काही पुस्तक आहे ज्यामधून आपल्याला अभ्यासासाठी उपयोगी साहित्य मिळेल.
 
* मॉक टेस्ट द्या- 
एखादा विध्यार्थी नीट ची तयारी घरातून करीत असताना शिकलेल्या संकल्पनेच्या आकलनाची पातळी समजण्यासाठी प्रश्नांचा सराव करावा.या शिवाय नीटच्या सॅम्पल प्रश्नपत्रांची मदत घ्या.
 
* स्वतःचे मूल्यांकन करा-
आपण जी तयारी केली आहे आणि कुठे मागे आहोत स्वमूल्यांकन केल्यानं आपण कुठे चुकलो आहोत हे शिकायला मिळते. असं केल्यानं चुका कळतील आणि गोष्टींना लक्षात ठेवण्यात मदत मिळेल आणि चुकांना दुरुस्त करून पुन्हा जोमानं तयारीला लागाल.  
 
* पुनरावृत्ती करा-
असं म्हणतात की मानवाचे मेंदू गोष्टी ची पुनरावृत्ती न केल्यानं विसरतो. म्हणून जर आपण केलेला अभ्यासाची पुनरावृत्ती केली नाही तर आपण विसरू शकता. म्हणून पुनरावृत्ती करा.
 
* केंद्रित करा-
आपले ध्येय काय आहे त्यावर लक्ष केंद्रित करा.उत्तम आहार घ्या.जेणे करून आपण निरोगी राहाल.
 
या टिप्स ला अवलंबवून आपण नीटच्या परीक्षेमध्ये यश मिळवू शकता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती