सॅमसंग गॅलेक्सी A71 ची विक्री सुरु, फोनमध्ये चार रिअर कॅमेरे

मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020 (10:35 IST)
स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने  A मालिकेतील सर्वात प्रीमियम स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी A71भारतात लाँच केला असून या फोनची भारतात विक्री सुरू झाली आहे. अ‍ॅमेझॉन इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन आणि सॅमसंगच्या अधिकृत संकेतस्थळावरुन खरेदी करता येईल.

या फोनमध्ये चार रिअर कॅमेरे असून अँड्रॉइड 10 चा सपोर्ट या फोनला देण्यात आलाय. Amazon च्या संकेतस्थळावर या फोनच्या खरेदीसाठी काही ऑफर्सही आहेत. जुना फोन एक्सचेंज केल्यास 13 हजार 600 रुपयांपर्यंत डिस्काउंट दिले जात आहे. तसेच, ग्राहकांच्या सोयीसाठी नो-कॉस्ट ईएमआयचा पर्यायही आहे.
 
सॅमसंगच्या या फोनमध्ये चार रिअर कॅमेरे आहेत. यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सह १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल, ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 5 मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला आहे. तर सेल्फीसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये 4G VoLTE, Wi-Fi, ब्लूटूथ, जीपीएस आणि युएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्ट मिळेल. याशिवाय फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असून फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4500mAh क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. या फोनमध्ये ड्युअल सिमकार्डच्या सपोर्टसह अँड्रॉइड 10 चा सपोर्टही आहे. तसेच स्नॅपड्रॅगन 730 ऑक्टाकोर प्रोसेसर असून 6.7 इंचाचा फुल एचडी प्लस सुपर अॅमोलेड डिस्प्ले आहे.
 
Samsung Galaxy A71 ची किंमत 29 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. या किंमतीत तुम्हाला 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मिळेल. हा फोन प्रिज्म क्रश ब्लॅक, प्रिज्म क्रश सिल्वर आणि प्रिज्म क्रश ब्लू अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध असेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती