Motorola ने भारतात लॉन्च केला Moto E6s, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

सोमवार, 16 सप्टेंबर 2019 (15:03 IST)
Motorola चा बजेट सेग्मेंटचा स्मार्टफोन Moto E6s भारतात लॉन्च झाला असून याची विक्री 23 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. 
 
Moto E6s फीचर
Motorola ने भारतात E सीरजचा नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. यात MediaTek प्रोसेसर देण्यात आले आहे. या स्मार्टफोनला 4GB रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेजसह लॉन्च केलं गेलं आहे. यात डुअल कॅमेरा देण्यात आला आहे तसेच यात वॉटर ड्रॉप स्टाइल नॉच देखील आहे.
 
Moto E6s किंमत 
Moto E6s ची किंमत 7,999 रुपये असून याची विक्री 23 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. आपण हा फोन ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टने खरेदी करू शकता. Moto E6s दोन कलर वेरिएंट्स – Rich Cranberry आणि  Polished Graphite मध्ये उपलब्ध आहे. 
 
Moto E6s ऑफर
ऑफर म्हणून हा फोन खरेदी केल्यावर आपल्याला 2200 रुपयेचा जिओ कॅशबॅक मिळेल सोबतच 3000 रुपये मूल्याचं Cleartip व्हाऊचर देखील दिलं जाईल.
 
Moto E6s स्पेसिफिकेशन्स
Moto E6s मध्ये 6.1 इंचाची एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आले आहे ज्यात वॉटर ड्रॉप स्टाइल नॉच देखील दिले गेले आहे. या स्मार्टफोनमध्ये 2.0GHz चे MediaTek Helio P22 देण्यात आले आहे. फोनमध्ये 4GB रॅमसह 64GB चं इंटर्नल स्टोरेज देण्यात आले आहे ज्याला मायक्रो एसडी कार्डाद्वारे वाढवता येऊ शकतं.
 
Moto E6s मध्ये फोटोग्राफीसाठी 13 मेगापिक्सलचा प्रमुख रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. डेप्थ सेंसिंगसाठी दुसरा कॅमेरा 2 मेगापिक्सलचा आहे. सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा डुअल सिम स्मार्टफोन Android Pie वर वर्क करतो.
 
Moto E6s मध्ये 3,000mAh ची बॅटरी देण्यात आली असून या फोनसह 10W चार्जर मिळतं. कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये रिअर फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आले आहे. या व्यतिरिक्त यात स्टॅडर्ड फीचर्स देण्यात आले आहे. ज्यात 4G LTE, Bluetooth, GPS, A GPS सारखे फीचर्स सामील आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती