कमी किंमतींत परवडणारे असे 4 फोन

शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2019 (15:25 IST)
मोबाइल यापुढे कॉल आणि संदेशांवर सीमित नाही तर हे मल्टिमीडिया प्लेअरपासून तर गेमिंग डिव्हाईस देखील बनला आहे. हे सर्व काम करण्यासाठी एक मजबूत रॅमची गरज आहे. आपले बजेट कमी असल्यास आणि आपल्याला अधिक रॅम असलेला फोन घ्यायचा असेल तर अशा काही फोनबद्दल जाणून घ्या। 
 
सर्वोत्कृष्ट बजेट स्मार्टफोन :-
 
# हॉनर 10 लाइट - चिनी कंपनी हुवावेच्या सब ब्रँड हॉनरने वर्षाच्या सुरुवातीस हॉनर 10 लाइट (Honor 10 lite) लॉंच केला होता. या फोनमध्ये 24 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आहे. तसेच, या फोनमध्ये एक नवीन एआर मोड आहे. 
 
डिस्प्ले: 6.2 इंच
रेजोल्यूशनः 2340 x 1080 पिक्सेल
रॅम: 4 जीबी
प्रोसेसर: किरिन 710 प्रोसेसर
सेल्फी कॅमेरा: 24 मेगापिक्सल
बॅक कॅमेरा: 13 + 2 मेगापिक्सेल
बॅटरी: 3400 एमएएच
 
# रेडमी नोट 6 प्रो - चिनी कंपनी शाओमी ने नोट 6 प्रोला भारतीय बाजारात नोव्हेंबरमध्ये लॉचं केला होता. या फोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटर्नल मेमरी दिली आहे. या फोनच्या मागील पॅनेलवर आणि सेल्फी पॅनेलवर ड्युअल कॅमेरा सेटअप आहे.
 
डिस्प्ले: 6.26 इंच
रेजोल्यूशनः 2280 x 1080 पिक्सेल
रॅम: 4 जीबी
इंटर्नल मेमरी: 64 जीबी
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅग 636
सेल्फी कॅमेरा: 12 + 5 मेगापिक्सल
बॅक कॅमेरा: 20 + 2 मेगापिक्सल
बॅटरी: 4000 एमएएच
 
# रियलमी यू1 - किंमत 11,999 रु - कमी बजेट असून देखील आपण लेटेस्ट डिस्प्ले डिझाइन म्हणजे नवीन नॅच्युअल स्मार्टफोन खरेदी इच्छित असल्यास ओप्पोच्या सब ब्रँड Realmi चा यू -1 स्मार्टफोन एक चांगला पर्याय आहे. यात 4 जीबी पर्याय देखील आहे. ज्याची किंमत 14,499 रुपये आहे. सेल्फी प्रेमींसाठी त्यात एआय सपोर्ट करणारा 25 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे.
 
डिस्प्ले: 6.3 इंच पूर्ण एचडी प्लस
रेजोल्यूशनः 2340 7 1080 पिक्सेल
रॅम: 3 जीबी
स्टोरेज: 32 जीबी
समर्थन स्टोरेज: 256 जीबी
कॅमेरा: 13 + 2 मेगापिक्सल
सेल्फी कॅमेरा: 25 मेगापिक्सल
प्रोसेसर: मिडियाटेक हेलीओ पी 70 ऑक्टाकोर
बॅटरी: 3500 एमएएच
 
# विवो वाय 93 - फुल व्यू डिस्प्ले सह येणारा हा फोन लेटेस्ट नॉचसह येतो. बॅक पॅनेलवर कंपनीने ड्युअल कॅमेरा सेटअप केला आहे. या फोनमध्ये मोठ्या डिस्प्लेसह मोठी बॅटरी देखील आहे. या व्यतिरिक्त, यात अँड्रॉइड 8.1 ओरीयो फनटच ओएस 4.5 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आला आहे.   
 
डिस्प्ले: 6.22 इंच एचडी प्लस
रेजोल्यूशन: 1520 x 720
रॅम: 3 जीबी
प्रोसेसर: हेलीओ पी 22 ऑक्टाकोर
इंटर्नल मेमरी: 64 जीबी
सेल्फी कॅमेरा: 8 मेगापिक्सल
बॅक कॅमेरा: 13 + 2 मेगापिक्सेल
बॅटरी: 4030 एमएएच

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती