ह्या 4 कामांनी देवी प्रसन्न होईल, भरभराटी येईल

नवरात्रीत नऊ देवींची आराधना केली जाते. देवी लक्ष्मीही दुर्गांचे रूप आहे. नवरात्रीत देवी लक्ष्मी आपल्यावरही प्रसन्न होऊ शकते. घरात स्वच्छता ठेवून आपण देवीला आपल्या घरी विराजमान होण्यासाठी काही सोपे उपाय करू शकतात. तंत्र शास्त्रानुसार देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात ह्या 4 वस्तू ठेवल्यास पैशाची चणचण दूर होईल. जाणून घ्या त्या 4 वस्तू आणि कशा प्रकारे त्यांची पूजा करावी ते:
 
नवरात्रीत धतुर्‍याचे मूळ पूजा स्थळी स्थापित करावे आणि 9 दिवस देवी महाकालीची पूजा आराधना करावी.
 
नवरात्रीत घरात केळीचं झाड लाववे. दररोज झाडाला जल चढवावे आणि गुरुवारी दूध अर्पित करावे. असे केल्याने पैशांची कमी दूर होते.
 
वडाच्या झाडाचं ताजं पानं तोडून आणावी. त्यावर स्वस्तिक मांडून पूजा स्थळी ठेवावे. नवरात्रीत पूजा करताना हे पान देवीला अर्पित करावं.
 
नवरात्री दरम्यान शंखपुष्पीचे मूळ आणावे. शुभ मुहूर्तात हे मूळ चांदीच्या डबीत ठेवून तिजोरीत ठेवावे. असे केल्याने पैशांची चणचण दूर होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती