Navratri 2020 : देवीच्या नऊ रूपांचे 9 शुभ वरदान

शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020 (16:26 IST)
1. शैलपुत्री :
दुर्गा देवीचं प्रथम रूप शैलपुत्री आहे. पर्वतराजा हिमालय यांची कन्या असल्याने दुर्गा देवीला “शैलपुत्री” असे म्हटले जाते. नवरात्रीत प्रथम तिथीला शैलपुत्री देवीची आराधना केली जाते. या देवीचे पूजन केल्याने धन-धान्याची भरभराटी येते. 
 
2. ब्रह्मचारिणी :
दुर्गा देवीचं दुसरे रूप ब्रह्मचारिणी आहे. ही देवी भक्तांना अनंत कोटी फल प्रदान करणारी आहे. या देवीची उपासना केल्याने तप, त्याग, वैराग्य, सदाचार आणि संयमाची भावना जागृत होते.
 
3. चंद्रघंटा :
दुर्गा देवीचं हे तिसरं स्वरूप चंद्रघंटा शांतिदायक आणि कल्याणकारी आहे. या देेेेेेवीची उपासना केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. वीर गुणांची वृद्धी होते. स्वरात माधुर्य येते आणि आकर्षक वाढतं. 
 
4. कुष्‍मांडा :
दुर्गा देवीचं चौथ्या रूपाचे नाव ‘कुष्मांडा’ आहे. आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे म्हटले जाते. या देवीची उपासना केल्याने सिद्धी, निधी प्राप्त होते आणि सर्व रोग-शोक दूर होऊन आयू आणि यशात वृद्धी होते.
 
5. स्‍कंदमाता :
दुर्गेचे पाचवे रूप ‘स्कंदमाता’ या नावाने ओळखले जाते. मोक्षाचे दार उघडणारी आई परम सुखदायी आहे. देवी आपल्या भक्तांची सर्व इच्छा पूर्ण करते.
 
6. कात्‍यायनी : 
दुर्गेचे सहावे रूप म्हणजे कात्यायनी. देवीचे पूजन केल्याने अद्भुत शक्तीचा संचार होतो. कात्यायनी साधकाला दुश्मनांचे संहार करण्यास सक्षम करते आणि या देवीचं संध्याकाळी ध्यान करणे अधिक फलदायी असतं.
 
7. कालरात्रि :
दुर्गा देवीचे सातवे रूप कालरात्रि असे आहे. कालरात्रि देवीचे रूप अतिशय भितीदायक जरी असले तरी हि देवी शुभदायीनी आहे, म्हणूनच ह्या देवीला “शुभंकारी” असे देखील संबोधण्यात येते. कालरात्रीची पूजा केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि शत्रूंचा नाश होतो तसेच तेज वाढतो.
 
8. महागौरी :
दुर्गा देवीचे आठवे रूप महागौरी. महागौरीचे पूजन केल्याने सर्व पापांचा क्षय होऊन चेहर्‍यावरील कांति वाढते. सुखात वृद्धी होते तसेच शत्रूंवर विजय मिळते.
 
9. सिद्धीदात्री :
माता दुर्गाचे नववे रूप सिद्धिदात्री. सिद्धिदात्रीची आराधना केल्याने अणिमा, लघिमा, प्राप्ति, प्राकाम्य, महिमा, ईशित्व, सर्वकामावसांयिता, दूर श्रवण, परकाया प्रवेश, वाक् सिद्धी, अमरत्व, भावना सिद्धी आदि समस्त नव-निधींची प्राप्ती होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती