दिल्ल्लीला जाणार आहात, आधी बातमी वाचा मगच नियोजन करा

बुधवार, 24 फेब्रुवारी 2021 (16:15 IST)
देशात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढतेय. यापार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रासह केरळ, मध्यप्रदेश, छत्तीसगड, पंजाब या राज्यातून येणाऱ्या रुग्णांची कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह असेल तरच दिल्लीत प्रवेश देण्याचा निर्णय केजरीवाल सरकराने घेतला आहे. महाराष्ट्रासह, केरळ, मध्यप्रदेश व इतर राज्यांमध्ये कोरोना प्रसार वेगाने पसरत आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये परिस्थिती पुन्हा चिंताजनक बनत आहे. यामुळे दिल्ली सरकारने खबरदारीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिल्लीत प्रवेश करताना कोरोना निगेटिव्ह RT-PCR दाखवणे गरजेचे असणार आहेत. २६ फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असून, १५ मार्चपर्यंत हे लागू असणार आहे. त्याचप्रमाणे या पाच राज्यांच्या मुख्य अधिकाऱ्यांनीही जाहीर केले की, दिल्लीत जाण्यासाठी ७२ तासांपूर्वीची कोरोना टेस्ट निगेटिव्ह असल्यानंतरच प्रवास करु शकतात. हा निर्णय रेल्वे, बस, विमान या सर्व वाहतूक प्रवासासाठी लागू असणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती