PUBG प्‍लेयरवर जीव आला, आता पतीकडून मागतिये घटस्फोट

देशात आता पर्यंत अनेक लोकांचा मृत्यू ऑनलाईन मोबाईल गेम PUBG चं वेड लागल्यामुळे झाला आहे. आता या वादास्पद गेमचा प्रभाव लोकांच्या नात्यांवर दिसून येत आहे. 
 
गेमच्या या सवयीमुळे एक प्रकरणात विवाहित महिलेचा जीव एका पबजी खेणार्‍या तरुणांवर असा जडला की तिने आपल्या पतीकडे घटस्फोटाची मागणी केली आहे.
 
गुजरातच्या अहमदाबाद येथे एका मुलाच्या आईला काही महिन्यांपूर्वी पबजी गेम खेळण्याची अशी सवय लागली ती तासोंतास गेम खेळत राहते. या दरम्यान ती एका तरुणाच्या संपर्कात आली, तो पबजीचा उत्तम प्लेयर आहे.
 
नंतर महिलेला गेमिंग पार्टनरचा साथ इतका आवडला की आता ती त्या तरुणासह राहू इच्छित आहे. तरुणासह जवळीक असल्यामुळे तिचा पतीसोबत वाद वाढल्यामुळे ती आपल्या वडिलांच्या घरी राहू लागली. आता तिने घटस्फोटासाठी वुमन हेल्पलाइनची मदत देखील मागितली आहे.
 
तसेच महिलेच्या या निर्णयाला वडिलांचे देखील समर्थन नाही. सोबतच हेल्पलाइन काउंसलरने देखील महिलेला या व्यसनातून बाहेर निघण्यासाठी मनोचिकित्सकाची मदत घेण्याची तसेच आपल्या निर्णयावर पुन्हा विचार करत घाईने कोणत्याही निष्कर्षावर न पोहचण्याचा सल्ला दिला आहे. उल्लेखनीय आहे की दक्षिण कोरियन मूळच्या हिंसक प्रवृत्तीच्या या ऑनलाईन गेमने अनेक लोकांना आपल्या घाप्यात घेतले आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती