कोण आहेत खासदार प्रताप सिम्हा, ज्यांच्या पासवर आरोपी संसदेत घुसले आणि उड्या मारल्या

बुधवार, 13 डिसेंबर 2023 (18:24 IST)
PRATAP SIMHA/X
लोकसभेच्या प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने गॅलरीतून उडी मारल्याची घटना घडली आहे. त्यानंतर संसदेची कारवाई स्थगित करण्यात आली होती.ज्या व्यक्तीने उडी मारली त्याने बेंचवरही उड्या मारल्या. या व्यक्तीला काही खासदारांनी चोप दिल्याची दृष्यंसुद्धा व्हायरल होत आहेत.
 
दरम्यान ज्या खासदाराच्या पासवर आरोपी संसदेत दाखल झाले. त्याचं नाव प्रताप सिम्हा असल्याची माहिती समोर आली आहे.
 
ते भाजपचे नेते आहेत. त्यांच्याच शिफारसीवर आरोपीचा पास तयार करण्यात आला होता.
 
47 वर्षीय प्रताप सिम्हा हे कर्नाटकातील म्हैसूरचे खासदार आहेत. ते दुसऱ्यांदा संसदेत पोहोचले आहेत. पत्रकार ते राजकारणी अशी त्यांची कारकीर्द आहे.
 
पत्रकारीतेतील कारकीर्द
प्रताप सिम्हा बद्दल सांगायचं तर त्यांनी पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतल आहे. 2011 मध्ये त्यांना पत्रकारितेसाठी प्रतिष्ठेचा राज्योत्सव पुरस्कार मिळाला.
 
त्यांनी राजकारणात येण्याआधी 13 वर्षं पत्रकारिताही केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर एक पुस्तक लिहिलं आहे. ज्याचं शीर्षक आहे 'नरेंद्र मोदी: यारू थुलियादा हादी' (नरेंद्र मोदी: द अनट्रोडन रोड).
 
सिम्हा कन्नड भाषेतील वृत्तपत्र विजया कर्नाटकमध्ये 1999 मध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झाले. नंतर त्यांना संपादक म्हणून पदोन्नती देण्यात आली आणि त्या काळात ते वरिष्ठ संपादक विश्वेश्वर भट यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत होते.
 
त्यांनी आपला स्तंभ 'बेताले जगट्टू' (The Naked World) या शीर्षकाखाली हिंदुत्वाचे समर्थन करत आणि विरोध करणाऱ्यावर त्यांनी टीका केली.
 
2014च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाचे सदस्य म्हणून उडुपी चिकमंगळूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती.
 
त्यानुसार भाजपने त्यांना उमेदवारी दिली. पण त्यांना म्हैसूरमधून निवडणूक लढवण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर कन्नड प्रभाचे पत्रकार सिम्हा यांनी एप्रिल 2014 मध्ये त्यांचा निवडणूक प्रचार सुरू करण्यापूर्वी पदाचा राजीनामा दिला.
 
2014 च्या निवडणूक निकालानंतर ते स्तंभलेखकापासून संसदपटू बनले होते.
 
जून 2015 मध्ये सिम्हा यांची प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.
 
एक राजकारणी आणि संसद सदस्य (खासदार) म्हणून सिम्हा हे हिंदुत्वाच्या प्रचारात त्यांच्या ठाम भूमिकांसाठी ओळखले गेले.
 
राजकीय कारकीर्द आणि वाद
प्रताप सिम्हा यांनी 2014 पासून राजकारणाला सुरुवात केली.
 
सिम्हा यांनी 2014 मध्ये म्हैसूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती आणि 32,000 मतांच्या फरकानं विजयी झाले होते.
 
त्याच वेळी, प्रताप यांनी 2019 मध्ये म्हैसूरमधून पुन्हा लोकसभा निवडणूक लढवली आणि काँग्रेस उमेदवाराचा पराभव करून 1.39 लाख मतांच्या फरकाने म्हैसूर लोकसभेची जागा जिंकली. भारतीय जनता पक्षाच्या कर्नाटक प्रदेश युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं.
 
सिम्हा यांचा खासदार म्हणून कार्यकाळ अनेक वादांनी गाजला होता. 2015 पासून कर्नाटक सरकारच्या टिपू सुलतानच्या जयंती सोहळ्याच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला होता.
 
त्यांनी म्हटलं होतं की "सुलतान केवळ इस्लामवाद्यांसाठी आदर्श असू शकतो आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या राज्यात जिहादींना प्रोत्साहन देत आहेत."
 
2017 मध्ये त्यांच्या मतदारसंघातील हुन्सूर या गावात हनुमान जयंतीच्या आयोजकांची मिरवणूक काढण्याविरुद्ध पोलिसांचे मनाई आदेश दिला होता. खासदार सिम्हा यांनी प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली.
 
फेब्रुवारी 2017 मध्ये गुरमेहरकौरची तुलना दाऊद इब्राहिमशी केल्यानं सिम्हा यांच्यावर टीका झाली. आरएसएसशी संलग्न असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधात बोलणारी ती दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी होती.
 
सिम्हा यांनी त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये अभिनेता प्रकाश राज यांच्या विरोधात विधानं करताना पुन्हा वादाला तोंड फोडलं.
 
सिम्हा यांनी ट्वीट केलं होते की, यात प्रकाश राज यांच्यावर वैयक्तिक टीका करत तुम्हाला योगी मोदींना काहीही बोलण्याचा अधिकार आहे का? असा सवाल उपस्थित केला होता.
 
त्यानंतर प्रकाश राज यांनी बिनशर्त सार्वजनिक माफी मागण्यासाठी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली, त्यानंतर सिम्हा यांनी त्यांच्या वर्तनाबद्दल सोशल मीडियावर जाहीर माफी मागितली होती.

Published By- Priya Dixit
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती