ईव्हीएम मशीनचे बटण दाबण्यासाठी ‘टूथ पिक’ चा वापर

रविवार, 26 जुलै 2020 (19:27 IST)
कोरोना संकट आणि पूर संकट दरम्यान बिहार विधानसभा निवडणूक वेळेतच पूर्ण करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यानंतर आयोगाने याबाबत नियमावलीचा आराखडा तयार केला आहे. यामध्ये निवडणुकीच्या वेळी मतदान कर्मचाऱ्यांना पीपीई किट घालावे लागणार आहे. मतदारांना संसर्ग होऊ नये म्हणून ईव्हीएम मशीनचे बटण दाबण्यासाठी ‘टूथ पिक’ चा वापर करण्यास सांगितले आहे. 
 
आयोगाचे सचिव एन टी भूटिया यांनी राजकीय दलांकडून ३१  जुलैपर्यंत आराखड्यासंदर्भात सूचना मागविल्या आहेत. त्याआधारे आयोगाकडून नियमावली जारी केली जाईल. आराखड्यानुसार सर्व कर्मचारी आणि निवडणुकीचे काम करणाऱ्या लोकांना मास्क आणि हातमोजे घालणे बंधनकारक असणार आहे. सार्वजनिक ठिकाणी, निवडणूक कार्यालय आणि पोलिंग बूथवर सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे लागेल. 
 
तसेच राजकीय पक्षांना रॅली काढण्यास मनाई असेल. सामाजिक कार्यक्रम आणि धार्मिक आयोजनांवर देखील बंदी असणार आहे. स्क्रीनिंग सक्तीचे असेल. पोलिंग बूथवर मतदारांचे थर्मल स्क्रीनिंग केले जाईल. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती