UPSC चा निकाल जाहीर, एकूण ८२९ उमेदवारांची निवड

मंगळवार, 4 ऑगस्ट 2020 (15:56 IST)
केंद्रिय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा २०१९ चे निकाल जाहीर केले आहेत. परीक्षेत प्रदीप सिंह देशात अव्वल आला आहे. तर दुसऱ्या स्थानी जतिन किशोर तर प्रतिभा वर्मा देशात तिसरी आणि महिला उमेदवारांमध्ये प्रथम आली आहे. यावर्षी विविध नागरी सेवा परीक्षा दिलेल्या एकूण ८२९ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
 
निवड करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये ३०८ उमेदवार जनरल कॅटेगिरी, ७८ उमेदवार ईडब्ल्यूएस कोटा, २५१ ओबीसी, १२९ एस सी आणि ६७ उमेदवार एसटी कॅटेगिरीतील आहेत. तर ११ उमेदवारांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे.
 
यूपीएससीने सप्टेंबर २०१९ मध्ये घेतलेल्या लेखी आणि फेब्रुवारी ते ऑगस्ट २०२० मध्ये घेतलेल्या मुलाखती किंवा व्यक्तिमत्त्व चाचणीच्या निकालाच्या आधारे निकाल जाहीर केला. उत्तीर्ण उमेदवारांची अंतिम यादी वेबसाईटवर घोषित केली आहे. 
 
महाराष्ट्रातील नेहा भोसले देशात १५ वी, बीड मधील मंदार पत्की देशात २२ वा, योगेश अशोकराव पाटील देशात ६३ वा आणि राहुल लक्ष्मण चव्हाण देशात १०९व्या स्थानी आला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती