आता उमा भारती निवडणुका लढवणार नाही

केंद्रीय मंत्री  उमा भारती यांनी यापुढे निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.  वय आणि आरोग्याचा हवाला देत, आता मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही. पण पक्षासाठी मी काम करतच राहील, अशी ग्वाही दिली. त्या म्हणाल्या, मी दोन वेळा खासदार राहिले आहे आणि पक्षासाठी खूप काम केले आहे. त्यामुळेच इतक्या कमी वयात मला शारीरिक त्रास सुरू झाला आहे. कंबर आणि गुडघ्यांच्या दुखण्यामुळे चालताना त्रास होतो. पण यापुढे पक्षाच्या प्रचाराचे काम करत राहीन असे सांगितले. 
 
उमा भारती या खजुराहो, भोपाळ आणि झांसी मतदारसंघातून लोकसभेवर आल्या आहेत. त्याचबरोबर मलेहरा आणि चरखारी येथून राज्य विधानसभेवर निवडूनही त्या गेल्या होत्या. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती