त्या सर्वाना पाहून डोळे पाणावले अखेर महालक्ष्मी एक्स्प्रेसचे प्रवासी घरी पोहोचले

सोमवार, 29 जुलै 2019 (10:06 IST)
एकदम जोरार  पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील  बदलापूर, वांगणी परिसरात जबरदस्पूत पूरपरीस्थिती निर्माण झाली, रेल्वेरूळ पाण्याखाली गेल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेस बदलापूर-आणि वांगणी स्थानकांच्यामध्ये अडकली होती. ट्रेनमध्ये  दोन हजार प्रवासी प्रवास करत होते, या सर्व प्रवाशांची सुटका करण्यासाठी स्थानिक गावकऱ्यांसह एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते.त्यांना सर्वाना सुखरूप वाचवले होते अखेर हे प्रवाशी आज एका विशेष ट्रेनने कोल्हापुरात पोहोचले. ज्या प्रवाशांना घरी  कोल्हापूरला जायचे आहे, अशा सर्वाना कल्याण येथून विशेष ट्रेन सोडण्यात आली. या विशेष ट्रेनमधून कोल्हापूरसाठी हे सावर निघाले. हे सर्व कोल्हापूरला पोहोचले. यावेळी रेल्वे स्थानकावर भावूक वातावरण पाहायला मिळाले. आपल्या नातेवाईकांच्या काळजीत पडलेले कुटुंबीयांनी रेल्वे स्थानकावर मोठी  गर्दी केली होती. तर नातेवाईकांसोबत 'जादू की झप्पी' घेताना कित्येक प्रवाशांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते.जर ही रेल्वे त्या दिवशी पुरात बुडाली असती तर मोठा अनर्थ घडला असता व हजारो लोकांना प्राणास मुकावे लागले असते, मात्र तसे बचाव पथकाने  होऊ दिले नाही. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती