सोमनाथ मंदिर परिसर ‘शाकाहारी क्षेत्र’ घोषित होणार

गुरूवार, 17 जानेवारी 2019 (09:19 IST)
गुजरात सरकारने सोमनाथ मंदिराचा परिसर ‘शाकाहारी क्षेत्र’ म्हणून घोषित करण्याची तयारी करत आहे. लवकरच याबाबत घोषणा केली जाईल, असे सांगण्यात येते. हा निर्णय जाहीर झाल्यानंतर सोमनाथ मंदिर परिसरात मांसाहार करण्यास तसेच अंडी विकताही येणार नाही किंवा खाताही येणार नाही.
 
काही दिवसांपूर्वी काही हिंदू संघटनांनी सोमनाथ मंदिर परिसरात मांसाहार आणि अंडी विकण्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. आंदोलनानंतरही दखल घेण्यात आली नव्हती. मात्र, आता सरकारने ही मागणी पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमनाथ मंदिर परिसरात अंडी आणि मांसाहारी पदार्थ विकता येणार नाहीत. यासाठी तीन किमी क्षेत्र निश्चित केले जाईल. मागील महिन्यात वेरावल येथे भाजपाच्या महापौरांनी मांसाहारावर बंदीचा प्रस्ताव संमत केला होता. मात्र, ही बंदी लागू झाली नव्हती. आता सरकारनेच हा प्रस्ताव मंजूर केला आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती