तेजप्रताप यादव गायब, आणखी एक धक्कादायक प्रकार

मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018 (15:42 IST)
पाच महिन्याच्या आतच लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांनी पत्नीसोबत घटस्फोट घेण्यासाठी कोर्टात रितसर अर्ज दाखल केल्यानंतर आता आणखी एक धक्कादायक प्रकार घडलाय. तेजप्रताप यादव बिहारमधील बोधगयाच्या एका हॉटेलमधून रात्री अचानक गायब झाले. तेजप्रताप यादव आपली सर्व सुरक्षा कवचं भेदून गायब झाले. रागाच्या भरात ते काल रात्री अचानक हॉटेलच्या मागच्या दरवाजानं बाहेर पडले. सुरक्षा रक्षकांना न सांगताच तेजप्रताप निघून गेल्यानं एकच खळबळ उडाली. 
 
रांचीच्या तुरंगात लालूप्रसाद यादव यांची भेट घेतल्यावर तेजप्रताप पाटण्याला परत येत असताना रविवारी बोधगयामध्ये थांबले होते. सोमवारी ते पाटण्याला जाणार होते. त्यानुसारच ते सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून पाटण्यात गेल्याचं आता पुढे आलंय.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती