दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका शिक्षक आपल्या घरीच तपासणार

रविवार, 10 मे 2020 (17:05 IST)
टाळेबंदीच्या काळात इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका शिक्षक आपल्या घरीच तपासणार असल्याचं मानव संसाधन मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी जाहीर केलं. यासाठी केंद्रीय शिक्षण माध्यमिक मंडळानं नियोजित केलेल्या 3 हजार मूल्यांकन केंद्रातून उत्तरपत्रिका शिक्षकांच्या घरी पाठवल्या जातील.

ही प्रक्रिया आजपासून सुरू होणार असून पन्नास दिवसात पूर्ण करण्याचं ठरवण्यात आलं आहे.

या तीन हजार मुल्यांकन केंद्रांना उत्तरपत्रिका तपासणी संबंधित काम करण्याची तसंच कंटेनमेंट झोनमधेही उत्तरपत्रिका तपासणीसाठी पाठविण्याची परवानगी गृहमंत्रालयानं दिली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती