स्वराज यांनी सरकारी निवासस्थान सोडले, सोशल मिडीयावर कौतुक

सोमवार, 1 जुलै 2019 (09:33 IST)
माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिल्लीतील आपले सरकारी निवासस्थान सोडले आहे. याबाबत त्यांनी टि्वटरवरुन याची माहिती दिली. नव्या सरकारचा शपथविधी झाल्यानंतर महिन्याभराच्या आत सुषमा स्वराज यांनी सरकार निवासस्थान रिकामे केले आहे. ८, सफदरजंग लेन मार्गावरील मी माझे सरकारी निवासस्थान सोडले आहे. आता मी आधीचा पत्ता आणि फोन नंबरवर उपलब्ध नसेन अशी माहिती सुषमा स्वराज यांनी टि्वटमधून दिली आहे. 
 
आधुनिक भारताच्या तुम्ही प्रतिष्ठीत नेत्या आहात. तुम्ही सरकारी निवासस्थान सोडले असेल. पण तुमचे स्थान वर्षानुवर्षे आमच्या ह्दयात कायम राहील. तुमच्या सारख्या नेत्यांमुळे राजकारणाचे जग चांगले आहे अशा शब्दात अनुपम खेर यांनी सुषमा स्वराज यांचा गौरव केला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती