BS-IV श्रेणीतील नव्या वाहनांच्या नोंदणीला स्थगिती

शुक्रवार, 31 जुलै 2020 (16:02 IST)
BS-IV श्रेणीतील नव्या वाहनांच्या नोंदणीला सर्वोच्च न्यायालयाने नवीन आदेश येईपर्यंत स्थगिती दिली आहे. १३ ऑगस्टला या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.
 
सरकारने BS-IV श्रेणीतील वाहनांची विक्री ३१ मार्च २०२० पासून बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र, २५ मार्चपासून देशात लॉकडाऊन जाहीर झाल्याने लॉकडाऊन संपल्यानंतर BS-IV श्रेणीतील उर्वरित वाहने पुढील 10 दिवसात विकण्यास सर्वोच्च न्यायालयाने मुभा दिली होती. तसेच या वाहनांची नोंदणी करण्याचा कालावधीही वाढवण्यात आला होता.
 
मात्र, लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर थोड्याच कालावधीत BS-IV वाहनांची नेहमीपेक्षा मोठ्या प्रमाणात विक्री झाली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत या वाहनांच्या नोंदणीला स्थगिती दिली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती