पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले 100 रुपयांच्या नाण्याचे अनावरण

मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020 (07:33 IST)
भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या दिवंगत राजमाता विजया राजे शिंदे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या सन्मानार्थ १०० रुपयांच्या नाण्याचं अनावरण केलं.
 
भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेत महत्त्वाचं योगदान असलेल्या विजया राजे सिंधिया यांनी ७ वेळेस लोकसभेत आणि २ वेळेस राज्यसभेत आपल्या मतदार संघांचं प्रतिनिधीत्व केलं होतं.
 
गेल्या शतकात देशाला दिशा दाखवणाऱ्या व्यक्तिमत्त्वांमध्ये राजमाता शिंदे यांचा समावेश असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती