गडकरी यांना भर सभारंभात चक्कर यामुळे आली, हे आहे कारण

शुक्रवार, 7 डिसेंबर 2018 (16:57 IST)
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्त्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभावेळी भाजपा जेष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ/चक्कर  का आली?. यामागील कारण आता समजले आहे. गडकरी यांनी दीक्षांत समारंभासाठी घातलेल्या कॉन्व्होकेशन गाऊनमुळे त्यांचा श्वास गुरमरल्यासारखं झाले होते, यामुळेच भोवळ/चक्कर आली, अशी माहिती स्वतः नितीग गडकरी यांनी दिली आहे. विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी विशिष्ट प्रकारचा गाऊन परिधान  करावा लागतो. या पोशाखामुळे गडकरी यांना अस्वस्थ वाटले होते. तर  समारंभ एका बंदिस्त सभागृहात झाल्याने त्यांचा श्वास गुदमरू लागला होता. श्वास गुदमरल्यानं भोवळ आल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. या आगोदर कॉन्व्होकेशन गाऊनमुळे असा प्रसंग घडले होते. तर दुसरीकडे त्यांची साखर, उच्च रक्तदाब योग्य होता.  
 
 
 
 कृषी विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यादरम्यान राष्ट्रगीत सुरु होते तेव्हा गडकरी यांना चक्कर आल्याने तातडीने  रुग्णालयात दाखल केले होते.  त्यावेळी तिथे उपस्थित असलेले राज्यपाल विद्यासागर राव यांनी त्यांना सावरले. दरम्यान, नितीन गडकरींची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती