मराठी चित्रपट भोंगाला राष्ट्रीय पुरस्कार, 'नाळ'मधील श्रीनिवास उत्कृष्ट बालकलाकार

शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019 (17:11 IST)
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा सन्मान शिवाजी लोटन पाटील यांच्या भोंगा या चित्रपटास मिळाला आहे.
आयुष्मान खुराणा, राधिका आपटे आणि तब्बूचा अंधाधुन हा चित्रपट सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बालपणावर आधारित चित्रपट 'चलो जीते है' ला कौंटुबिक मूल्यांवर आधारित सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. 'आई शपथ' या चित्रपटाचे दिग्दर्शक गौतम वझे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे.
 
'नाळ' या मराठी चित्रपटातील बालकलाकार श्रीनिवास पोकळे याला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती