मारण्यासाठी इनाम जाहीर करण्याला लोकशाहीत थारा नाही

कलाकारांना हिंसक धमक्या देणे किंवा त्यांना मारण्यासाठी इनाम जाहीर करणे, या गोष्टींना लोकशाहीत थारा नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्याचवेळी लोकांच्या भावनांचाही आदर राखला जाणे गरजेचे असल्याचे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू  यांनी व्यक्त केले आहे. ते दिल्लीत  साहित्य महोत्सवात बोलत होते. 
 
यावेळी त्यांनी म्हटले की, सध्या काही चित्रपटांवरून वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटांमुळे विशिष्ट धर्माच्या किंवा समाजाच्या भावना दुखावल्या जातात, असा आक्षेप घेत त्याविरोधात आंदोलन सुरू आहे. मात्र, या आंदोलनादरम्यान काही जणांनी मर्यादांचे उल्लंघन करत संबंधित चित्रपटातील कलाकारांवर हल्ला करण्यासाठी बक्षीस जाहीर केले आहे. बक्षिस देण्यासाठी या लोकांकडे खरंच इतका पैसा आहे का, असा प्रश्न मला अनेकदा पडतो. प्रत्येकजण एक कोटींचे इनाम जाहीर करतो. एक कोटी रूपये देणे त्यांच्यासाठी खरंच इतके सोपे आहे का?, असा सवाल नायडू यांनी विचारला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती