गौरवास्पद : वरळी सीफेस महापालिका शाळा ठरली देशातील सर्वोत्तम शाळा

गुरूवार, 12 नोव्हेंबर 2020 (10:03 IST)
देशातील सर्वोत्तम १० शासकीय शाळांच्या क्रमवारीत मुंबईतील वरळी सीफेस या महापाालिकेच्या शाळेने क्रमांक पटकावला. हे स्थान पटकावणारी राज्यातील व देशातील ती पहिलीच पालिका शाळा ठरली आहे. तिरुअनंतपुरम येथील केंद्रीय विद्यालय, नवी दिल्लीतील राजकीय प्रतिभा विकास विद्यालय आणि आयआयटी मद्रासच्या केंद्रीय विद्यालयाने अनुक्रमे पहिले, दुसरे व तिसरे स्थान मिळविले आहे.
 
वरळी सीफेस एमपीएस शाळेच्या इमारतीप्रमाणेच शाळेमधील विद्यार्थ्यांसाठीच्या भौतिक सुविधा, सहशालेय उपक्रम गुणवत्ता व शैक्षणिक दर्जा उंचावणारे असल्याची माहिती शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिली. प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांचा दर्जा उत्कृष्ट ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती