मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी मिलिंद देवरा

मंगळवार, 26 मार्च 2019 (08:30 IST)
मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून संजय निरूपम यांची उचलबांगडी करत, माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांच्याकडे मुंबई सोपवण्यात आली आहे. त्यामुळे तब्बल 16 वर्षानंतर पुन्हा मुंबईत देवरा पर्व सुरू होणार आहे. 
 
मुंबईत देवरा गटाचे सुरूवातीपासून वर्चस्व राहिले आहे. 1981 ते 2003 असे सलग 22 वर्ष काँग्रेसचे दक्षिण मुंबईतील दिवंगत नेते मुरली देवरा मुंबईचे अध्यक्ष होते. 22 वर्ष मुंबई अध्यक्ष पदी राहणारे मुरली देवरा एकमेव काँग्रेस नेते ठरले आहेत. पण देवरा यांच्या मुंबईतील वर्चस्वाला पहिल्यांदा सुरूंग लावण्याचे काम काँग्रेसचे दिवगंत माजी खासदार गुरूदास कामत यांनी केले. कामत यांच्याकडे काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मुंबई काँग्रेसची जबाबदारी सोपवली. त्यामुळे देवरा यांचे वर्चस्वी हळूहळू कमी झाले. कामत यांच्यानंतर मुंबई अध्यक्ष पदाची जबाबदारी कृपाशंकर सिंह, प्रा. जनार्दन चांदुरकर यांनी पेलली होती.

हे दोन्ही अध्यक्ष कामत यांच्या मर्जीतील असल्यामुळे कामत यांचे मुंबईत चांगलेच वजन होते. पण काँग्रेसने मुंबई अध्यक्षपदी संजय निरूपम यांची नियुक्ती करताच, काँग्रेसमध्ये कामत व निरूपम असे दोन गट तयार झाले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती