'मैं भी चौकीदार' मुळे दूरदर्शनला नोटीस

गुरूवार, 4 एप्रिल 2019 (07:49 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'मैं भी चौकीदार' कार्यक्रम लाईव्ह दाखवल्याने आयोगाने दूरदर्शनला नोटीस जारी केली आहे. 31 मार्चला प्रसारित झालेला हा कार्यक्रम दूरदर्शनने साधारण दीड तास लाईव्ह दाखवला. भारतीय जनता पार्टीच्या 'मैं भी चौकीदार' कॅम्पेन अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 मार्चला देशाच्या 500 ठिकाणांवरील लोकांना संबोधित केले होते. पंतप्रधानांचा हा कार्यक्रम दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये झाला होता. याचे प्रसारण रेडिओ, टीव्ही आणि सोशल मीडिया वर देखील झाले होते. यावरच निवडणूक आयोगाने आक्षेप नोंदवला.  
 
दूरदर्शनला नोटीस पाठवण्यासोबतच निवडणूक आयोगाने पंतप्रधान मोदींच्या 'नमो टीव्ही' वर देखील आक्षेप नोंदवला आहे. आयोगातर्फे माहिती व प्रसारण केंद्राला यासंदर्भात नोटीस पाठवण्यात आली असून यासंबधी उत्तर मागितले आहे.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती