नशा करण्यासाठी केला डॉक्टरांसारखा पोशाख, शोधत होते अंमली पदार्थ

शनिवार, 11 एप्रिल 2020 (13:21 IST)
देशभरात लॉकडाऊन असल्याळे घरातून बाहेर निघणे सोपे नाही अशात नशा करण्याची सवय असणारे दोन तरुण स्वत:ला डॉक्टर म्हणून मिरवत असताना धरले गेले आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. दोघेही डॉक्टरांसारखा पोषाख करुन रस्त्यावर फिरत होते. 
 
माहितीनुसार रस्त्यावर डॉक्टरांसारख्या पोशाखात फिरत असलेल्या दोन तरुणांना एका नाकाबंदीजवळ पोलिसांनी चौकशीसाठी थांबवले. यावेळी दोघांनी आम्ही डॉक्टर असून करोनाच्या रुग्णांवर उपचार करतो असे सांगितले परंतू दोघांची हलचाल, हावभाव संक्षयास्पद वाटत असल्याने पोलिसांनी सक्तीने विचारपूस केली. तेव्हा दोघेही नशेत असल्याचे कळून आले. झडतीत एका तरुणाकडे स्मॅक हा अंमली पदार्थ अढळून आला. 
 
शहरातील पॉलिटेक्नीक क्रॉसिंगजवळ या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हा हे दोघे डॉक्टर नसल्याची माहिती समोर आली. दोघांनाही अंमली पदार्थांचे सेवन करण्याची सवय असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती