स्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना जन्मठेपेची शिक्षा

मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018 (16:24 IST)
हरियाणातील सतलोक आश्रमातील हत्‍याकांडप्रकरणी स्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनाविली आहे. हिसारच्या विशेष न्यायालयानं रामपालला शिक्षा सुनाविली आहे. रामपालवर सतलोक आश्रमातील ५ महिला आणि एका मुलाच्या हत्येचा आरोप होता. या प्रकरणांमध्ये त्याला न्यायालयाने ११ ऑक्टोबर रोजी दोषी ठरविले होते. त्यानंतर त्याला शिक्षा सुनावण्यात आली. रामपालसोबत त्याच्या २६ अनुयायांनाही दोषी ठरवण्यात आले होते, त्‍यातील १५ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.  
 
निकालाच्या पार्श्वभूमीवर हिसारमध्ये हिंसाचाराच्या घटना घडू नयेत म्हणून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. २०१४ मध्ये रामपाल याच्या आश्रमात त्याचे समर्थक आणि पोलिसांत धुमश्चक्री होऊन हिंसाचार भडकला होता. यात ७ जणांचा मृत्यू झाला होता. त्यात ५ महिला आणि १ मुलाचा समावेश होता. या प्रकरणी रामपालसह १४ जणांवर गुन्हे दाखल केले होते. रामपाल याच्यावर सुमारे ६ एफआयआर नोंद झाले आहेत. रामपालला नोव्हेंबर २०१५ मध्ये अटक करण्यात आली होती. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती